जिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे खा. अशोक नेते यांच्याहस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त आज ७ डिसेंबर रोजी येथील जिल्हा प्रेक्षगार मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक  नेते यांच्या हस्ते  करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगीताताई भांडेकर,  समाज कल्याण सभापती माधुरीताई उरेते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, डॉ भारत खटी, विधानसभा विस्तारक दामोदरजी अरगेला, नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी दृष्टीहीन व अपंगांना  दिव्यांग असे संबोधित करून त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी असे सांगुन दिव्यांग मुलांना आवश्यक साहित्य व सोयी सुविधा आपण जानेवारी महिन्यात पुरविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला दिव्यांग शाळेचे शिक्षक व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-07


Related Photos