महत्वाच्या बातम्या

 बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व केमिकलयुक्त सांडपाण्या विरोधात उलगुलान संघटनेचे आंदोलन


- राजू झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांची तीव्र आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर जवळील बामणी प्रोटिन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे आसपासच्या शेतीला व जनावरांना धोका झाला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी आंदोलन करून तीव्र रोष व्यक्त केला. बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीचे दूषित पाणी नाल्याच्या प्रवाहात वाहत असल्याने आजूबाजूच्या शेतीला तेथील जनावरांना प्रदूषणाच्या संकटाचा सामना करावा लागत असून शेतीची मोठी नुकसान होत आहे. तसेच जनावरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबत प्रशासनाला प्रदूषण दूर करून समस्या सोडवाव्या याकरिता निवेदने दिलेली होती.

परंतु सदर मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने राजू झोडे व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिडीत गावकऱ्यांसमवेत बामणी चौक, बल्लारपूर येथे प्रदूषणा विरोधात व कंपनी विरोधात नारेबाजी करून तीव्र आंदोलन केले. सदर आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, आभाजी पाटिल देखकर, नंदलाल वर्मा, श्रीहरि येनचूरी, धीरज निरजंने, गोपी ठआठूर, श्याम झिल्लपे, शंकर साळवे, अक्षय देरकर, धीरज बांबोडे, विनोद देरकर, संजय तुरानकर, गोलू नागरे, गणेश काकडे, पंचशील तामगाडगे तसेच उलगुलान संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ता व परिसरातील गावकरी उपस्थित होते. जर या विरोधात तात्काळ दखल घेण्यात आली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने शासन व प्रशासनाला दिला.





  Print






News - Chandrapur




Related Photos