अरततोंडी आणि परसवाडी येथील अनुदानित आश्रमशाळांवर नेमले प्रशासक


- आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी दिले आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्था जोगिसाखरा अंतर्गत संचालित अनुदानित आश्रमशाळा अरततोंडी आणि परसवाडी या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याचे आदेश एकात्मिक आदिवासी विकास गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
आदिवासी विकास निरीक्षक एल.जी. कायरकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश ४ डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत. त्यांच्याकडे दोन्ही आश्रमशाळांच्या प्रशासकीय व वित्तीय बाबींचे अधिकार देण्यात आले आहेत. या दोन्ही आश्रमशाळांच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दोन्ही आश्रमशाळांवर प्रशासक नेमण्यात आले आहे. तत्काळ अहवाल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-07


Related Photos