महत्वाच्या बातम्या

 प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ओळखपत्रासाठी शिबिराचा लाभ घ्यावा : जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार


- प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे शिबिराचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अहेरी विधानसभेतील त्या-त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपल्या वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. 9 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या शिबिरातून दिव्यांग बांधवांना नक्कीच याचा फायदा होणार असल्याचे सांगितले. संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची, जिल्हा व तालुका प्रशासनाची त्यांनी स्तुती केली.

प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे घेण्यात आलेल्या शिबिरात सर्व प्रवर्गातील एकूण 435 दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरा मार्फत दिव्यांगत्व प्रमाण पत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. त्यापैकी अंदाजे 310 पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑनलाइन पोर्टल द्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र आणि शासनाच्या विविध योजनांचे माहिती पत्रक स्पीड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. तसेच लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकते नुसार साहित्य उपकरणे देण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवर, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, नागेपल्लीचे उपसरपंच शागोंडावार काका, नागेपल्ली ग्रा प सदस्य मलरेड्डी येमनूरवार, राजू दुर्गे सदस्य ग्रा.प.महागाव, वैकना कोडापे, अहेरीचे गटविकास अधिकारी अशोक कुरझेकर, कृषी अधिकारी प्रदीप राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे, डॉ. अलका उईके तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजीत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos