महत्वाच्या बातम्या

 नागपूर : मतदार यादीतील नाव तपासून घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयातील मतदार यादी शुध्दीकरणाचे काम आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हयातील सर्व मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नाही अशा मतदारांचे नाव नियमानुसार आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरून घेऊन विहीत मुदतीत मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबच्या सुचनाही दिलेल्या आहे.

चंद्रपूर जिल्हयात 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमा अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करुन घेण्यात येत असून जे मतदार त्यांचे पत्त्यावर आढळत नाही अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुट्या दूर करावयाच्या आहे. 1 जाने. 2023 रोजी प्रसिध्द अंतिम मतदार यादीती जिल्हयातील 80 वर्षावरील एकूण 1,27,410 मतदारांचे बीएलओ यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात मतदार मृत आहे व जे मतदार त्यांच्या नमूद पत्त्यावर राहत नाही त्यांचे मतदार यादीमधून नाव वगळण्याची तसेच ज्या मतदारांचे ज्या मतदार यादीमध्ये चुकीने त्यांचे मूळ वयापेक्षा जास्त टाकण्यात आलेले आहे अशा मतदारांची नांदीची नमुना 8 भरून दुरूस्ती करून घेण्यात येत आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कडून मतदार यादीतील अस्पष्ट फोटो असलेल्या 66,281 मतदारांचे कार्ड शोधून कार्यवाही करीता उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. त्यानुसार नागपूर जिल्हयातील बीएलओ यांचेव्दारा मतदारांची चौकशी करुन त्यांचे स्पष्ट व योग्य फोटो गोळा करून तसेच त्यांच्या नावाच्या नोंदीमध्ये इतर चुका नसल्याची खात्री करून नलदाराकडून नमुना क्र. 8 भरुन घेण्यात येत असून EROhet या प्रणालीवर त्यांच्या फोटोतील दुरुस्ती व इतर दुरुस्तीची नोंद करण्यात येत आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांचे कार्यालयाकडून जिल्हयात एकूण 1,00,065 सारखे दिसणारे फोटो असलेल्या मतदारांचे रेकार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याबाबतही बीएलओव्दारे प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी सुरू असून दुय्यम  आढळून आलेल्या मतदारांचा नमुना क्र. 7 भरुन व जे मतदार पत्त्यावर आढळून आले नाही त्यांचा पंचनामा तयार करून नावाची वगळणी करण्यात येत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos