महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर शहरातील शासकीय शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आम आदमी पार्टीचा पुढाकार


- अधिकाऱ्यांना सरकारी शाळांना भेट द्यावी लागली : रविकुमार पुप्पलवार शहराध्यक्ष 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील शासकीय शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आम आदमी पार्टी ने शासकीय अधिकाऱ्यांसमवेत शाळांना भेट दिले.  

उपविभागीय अधिकारी दीप्ती पाटील, तहसीलदार स्नेहल राहाटे, नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, सह अधिकारी आणि आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर कार्यकारिणी यांनी सरकारी शाळांना भेट दिली. बल्लारपूर शहरातील शासकीय शाळांची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी निवेदन, निदर्शने, आंदोलने यांच्या माध्यमातून आम आदमी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे, आप बल्लारपूर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी आपल्या अविरत प्रयत्नाने बल्लारपूर शहरातील अधिकाऱ्यांना शासकीय शाळांना भेटी द्याव्या लागल्या. इतिहासात प्रथमच शहरातील शासकीय शाळांचे शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आम आदमी पक्षाने बल्लारपूर शहरातील अधिकार्‍यांना शासकीय शाळांची शिक्षण व्यवस्था सुधारण्यास भाग पाडले, आता शहरातील सर्वसामान्यांच्या मुलांना चांगले शिक्षण, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी आम आदमी पक्षाने बल्लारपूरमध्ये हा पुढाकार घेतला आहे.

यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, सचिव ज्योती बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, युवक अध्यक्ष सागर कांबळे, युवा सचिव रोहित जंगमवार, संघटक अलिना शेख, सीवायएसएस प्रमुख शिरीन सिद्दीकी, सहसंपर्क प्रमुख डॉ. आशिष गेडाम, अफजल अली, फजल अली, गौतम रामटेके आदी कामगार उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos