महत्वाच्या बातम्या

 पोटेगाव आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पोटेगाव येथे शुक्रवार १० मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.     

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, डॉ.एस.डी.गोटमवार, माध्यमिक शिक्षिका प्रमिला दहागावकर, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, प्राथमिक शिक्षक व्ही.एस.कापसे, व्ही.एम.नैताम, व्ही.एस. देसू , एन.पी.नेवारे, चुन्नीलाल पारधी, जयश्री रामगीरवार, अधीक्षिका लुंबिनी शंभरकर, निकिता ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत तसेच त्यांच्या जीवन कार्यावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. 

प्रास्ताविक व संचालन जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे तर आभार पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत बोधे, विनोद बेहरे, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos