महत्वाच्या बातम्या

 क्रिडा विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त खेळांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या खेळांचा मुली, युवती व महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधुन शालेय मुली, महाविद्यालयीन युवती व सर्व महिलांमध्ये तंदुरुस्ती व आरोग्याबाबत जागृकता निर्माण करण्याकरीता तसेच मुलींना अधिकाधिक क्रीडा विषयक सोई सुविधा, मोकळे  वातावरण, कौशल्याची संधी, मुलींच्या आरोग्य, योग्य सवयी उपलब्ध करुन दिल्यास स्त्रीयांची पर्यायाने कुटुंबाची सुधारणा होऊन सशक्त समाज उभा राहील, त्यासाठी या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित करण्यात आलेल्या खेळांमध्ये 13 ते 14 मार्च रोजी बॅडमिंटन, 15 मार्च रोजी शुटींग, 17 मार्च रोजी जलतरण, 20 ते 21 मार्च रोजी हॅन्डबॉल व 23 ते 24 मार्च रोजी हॉलीबॉल खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील जलतरण खेळ नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे व उर्वरीत खेळ जिल्हा क्रीडा संकुल येथे होईल. जिल्ह्यातील मुली, युवती व महिलांनी सहभागासाठी 12 मार्च पर्यंत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय येथे नोंदणी करावी, असे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos