दारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नांदेड :
दारू सोडवण्याचे कथित औषध पिल्याने २  सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  नादेंड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात  घडली आहे.  संजय ज्ञानदेव मुंडे (३८), विजय ज्ञानदेव मुंडे (३५) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत.  आपले दारुचे व्यसन सोडविण्यासाठी हे दोन्ही भाऊ हदगाव येथे एका घरगुती उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे गेले होते. मात्र, त्याच्याकडील औषध पिल्यानंतर या दोघांचाही मृत्यू झाला आहे.  
 परळी तालुक्यातून हे दोघे भाऊ दारू सोडवण्याचे कथित औषध घेण्यासाठी  आले होते. या घटनेने हदगावसह परळीतही खबळब उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात   त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर, त्यांचे मृतदेह कुटुबीयांच्या ताब्यात देण्यात येतील. दरम्यान, हदगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 



  Print






News - Rajy | Posted : 2018-12-07






Related Photos