महत्वाच्या बातम्या

 उत्तम आरोग्यासाठी महिलांनी करावा पौष्टिक तृणधाण्याचा वापर : डॉ. उषा डोंगरवार


- कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे महीला दिन उत्साहात साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महिला बचत गटांनी संघटीत होऊन, मेहनत करून व कृषि आधारित प्रशिक्षणे घेऊन स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा आर्थिक विकास साधावा तसेच महिलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असून त्या जोरावर त्या अडचणींवर मात करून पाहिजे ती गोष्ट साध्य करू शकतात, राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून महिलांनी स्वताच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन, कौशल्य विकसित करून विकास साधावा आणि सदर वर्ष हे पौष्टीक तृणधान्य वर्ष असून महिलांनी उत्तम आरोग्याकरिता पौष्टीक तृणधाण्याची लागवड करून त्याचा आहारात वापर करावा असे प्रतिपादन केले. ज्वारी, बाजरी, रागी, कोदो, कुटकी,राजगिरा, राळा, सावा, यांचा वापर आहारात करावा. या भरड धान्यामध्ये कॅल्शीयम, मॅग्नेशिअम, लोह, फॉसफरस यांसारखे अनेक घटक उपलब्ध असल्याने आरोग्य चांगले राहते असे प्रतिपादन केले. 

कृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारायाच्या संयुक्तविद्यमाने ०८ मार्च २०२३ बुधवारला कृषि विज्ञान केंद्र साकोली या ठिकाणी जागतिक महीला दिन आणि चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाला १२५ शेतकरी व महिला उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.पि. गीदमारे, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन डॉ. उषा रा. डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली उपस्थित होते. यांच्यासह शिवाजी भारती, सदस्य, सर्ग विकास समिती. झंझाळ मंडळ कृषि अधिकारी, साकोली, रजनीगंधा टेंभूरकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा,साकोलीतसेच कृषी विज्ञान केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत. कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील अधिकारी यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी देऊन करण्यात आले. 

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले. या प्रसंगी त्यांनी महिला दिनाचे महत्व व महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग याविषयी माहिती दिले. कार्यक्रमाचे उद्घाटक पि.पि. गीदमारे यांनी शेतीमध्ये महिलेचा वाटा जास्त असून त्यांनी प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा भरारी घेतलेली आहे व महिलांकरिता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिले. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रमोद पर्वते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण खिरारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Bhandara




Related Photos