महत्वाच्या बातम्या

 महिला दिनानिमित्त लाहेरी पोलीस स्टेशन येथे भव्य महिला मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : स्त्री हा मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. परंतु स्त्रीला त्या प्रमाणात महत्त्व प्राचीन काळामध्ये महत्त्व तर देण्यात आले नव्हतेच परंतु त्यांच्यावर खूप अन्याय केला जात असे. परंतु महिलांना समाजामध्ये पुढे आणण्यासाठी व त्यांना समान हक्क देण्यासाठी महिला स्वतःचा लढा उभारला होता. स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्त्रियांना पूर्वीच्या काळात सूर निमोन इथपर्यंतच त्यांचे जीवन होत त्यांना मतदानाचा, बाहेर फिरण्याचा , शिक्षण घेण्याचा, तसेच नोकरी करण्याचा, खेळ खेळण्याचा असे कुठलेही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते.

प्राचीन काळात असा समज होता की महिला समाजातील असक्षम घटक आहे. त्या पूर्णतः पुरुषांवर निर्भर आहेत त्यामुळे त्यांना या सर्व कामांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. यामुळे ते समाजापासून अधिकच दुरावत गेल्या होत्या. परंतु सध्याच्या काळामध्ये महिलांनी देशाच्या संरक्षणापर्यंत जबाबदारी स्वीकारली आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला सर्वोच्च स्तरावर आहेत. जगाच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उंच भरारी घेतली आहे. परंतु गडचिरोली सारख्या अधिक दुर्गम, अति नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागात महिलांना अजूनही पूर्णतः स्वतंत्र मिळालेले नाही अथवा त्यांच्या पर्यंत शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्या समाजापासून आजही जोडल्या गेलेल्या नाहीत. अजूनही त्यांचे जीवन चूल आणि मुल पर्यंतच आहे.

राज्यभर खूप अनेक प्रकारच्या संस्था, महिलांना सक्षमी करणासाठी कार्यरत आहेत परंतु गडचिरोली सारख्या दुर्गम भागापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत म्हणूनच याची दखल आता स्वतः लाहेरी पोलिसांनीच घेऊन येथील पीडित/दुर्लक्षित महिलांना मुख्य प्रवाहमध्ये आणण्या करिता महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च 2023 रोजी लाहेरी पोलीस स्टेशन येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्याकरिता विरंगुळा म्हणून मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच त्यांच्या हक्कांची जाणीव करण्यासाठी भाषणं व त्यांच्या गरजेच्या वस्तू वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य , जन नायक बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उप पोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी माननीय प्रशांत डगवार यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. त्यामध्ये त्यांनी महिला सक्षमी करणावर भाष्य करत महिलांमध्ये असलेले अपार शक्तीची जाणीव त्यांना करून दिली. जगभर असलेला महिलांचा डंका त्यांनी दुर्लक्षित पीडित महिलांच्या कानापर्यंत पोहोचवला तसेच महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही कायम तत्पर असू अशा आश्वासन दिले. तसेच महिलांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. असे सांगत त्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच महिला सक्षमी करणासाठी असलेल्या विविध योजनांचे व त्याबाबत असलेले लाभ याबाबत सखोल मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा व महिलांना समाजाशी जोडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

त्यामध्ये त्यांनी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत चालू करण्यात आलेल्या विविध योजने बाबत नागरिकांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक , आरोग्य , शैक्षणिक, सक्षमीकरण करण्याचे आश्वासित केले. तसेच मेळाव्याची रूपरेषा सांगितली. त्यानंतर कार्यक्रमास हजर असलेले सचिन सरकटे आलेल्या सर्व नागरिकांना, महिलांना, पोलीस स्टेशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास मौजा फोदेवाडा येथील सरपंच मीनाक्षी हबका, होडरी सरपंच, लाहेरी सरपंच राजेश्वरी बोगामी, विविध गावांमधील अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य केंद्रांमधील नर्स खूप मोठ्या प्रमाणावर हजर होत्या.

तसेच विविध खेड्यापाड्यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर महीलांनी, युवक युती नागरिकांनी, मोठ्या प्रमाणावर मेळ्याव्यास हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात अध्यक्षांच्या व पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे व लहरी पोलिसांच्या हस्ते जमलेल्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच वार्षिक कॅलेंडर, सिलेंडर गॅस, इतर दैनंदिन उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मेळाव्यास हजर असलेल्या सर्व नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा उप पोस्टे लाहेरीच्या मपोना शारदा खोब्रागडे यांनी सांभाळली. मपोना वर्षाताई डांगे यांनी अतिदुर्गम भागातून पायी चालत मेळाव्यास आलेल्या महिलांचे , नागरिकांचे व प्रमुख पाहुण्यांचे व सदर कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेणारे एसआरपीएफचे व उप पोस्टे लाहेरी, सी.आर.पी.एफचे अंमलदार व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत डगवार व प्रमुख पाहुणे सीआरपीएफचे असिस्टंट कमांडर अशोक कुमार टि, पोलीस निरीक्षक शीतला प्रसाद हे होते. कार्यक्रमास सीआरपीएफ बटालियन 37 कंपनी ए व सी चे पोनि रेड्डी, मिश्रा व सर्व जवान उपस्थित होते. तसेच विविध गावचे तरुण युवतींन , महिला वर्ग एकूण अंदाजे पाचशे नागरिक मेळाव्यास उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी विभाग भामरागड नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार, त्यामध्ये स.फौ.मचिरके, पोहवा/ भांडेकर, सुधीर सेडमाके, सखाराम सेडमाके, परसा , नापोशि /गाठले, कांगणे, मपोना / प्रेमिला जुमनाके, डांगे, रत्नमाला जुमनाके, तुलावी, खोब्रागडे, पोशि /कुभरे, सुर्यवंशी, मडावी, घुगे, मोरे, गलगट, मस्के, माटे, अनिकेत खोब्रागडे, कोतकोंडवर मपोशी /सुल्लावर, दुधे, अचाल कुमरे हे हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मपोना शारदा खोब्रागडे, यांनी केले. व आपल्या भाषणातून - मपोना प्रेमिला जुमनाके, रत्नमाला जुमनाके, यांनी महिलांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
तसेच एसआरपीएफचे अधिकारी, नलावडे व अंमलदार आदींनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos