महत्वाच्या बातम्या

 आदर्श महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न


- स्त्री ही वात्सल्य, मांगल्य, मातृत्व व कर्तृत्व संपन्न - डॉ. जयदेव देशमुख

 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : ज्यावेळी अधिकाधिक जर लोकांचे प्रश्न व समस्या सामान्य असतात, विशिष्ट घटकांकडून अन्याय सहन करीत असतात त्यावेळी त्याविरुद्ध लढा देऊन आंदोलन यशस्वी करण्याची संकल्पना समोर येते. असेच १९०८ मध्ये या दिवशी न्युयॉर्क मध्ये स्त्री कामगारांनी यशस्वी आंदोलन केले. जागतीक स्तरावर स्त्रियांचा मान व सन्मान राखणे महत्त्वाचे आहे कारण महिला हीच वात्सल्य, मांगल्य, कर्तृत्व व मातृत्व व प्रेम आहे. असे मौलिक मार्गदर्शन डॉ जयदेव देशमुख यांनी अध्यक्ष स्थानावरून केले. ते आदर्श महाविद्यालयात महिला सक्षमीकरण विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन प्रसंगी बोलत होते.

यावेळी मंचावर डॉ. हितेंद्र  धोटे, डॉ. वैशाली बोरकर, प्रा. मनिषा कार, प्रा. शितल दोनाडकर, प्रा अदिती नागपूरकर, प्रा. लिना उरकुडे, प्रा. प्रिती मेश्राम , डॉ. विठ्ठल चव्हाण मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. आजची महिला समाजात स्वच्छंद मनाने व निर्भीडपणे वागतांना पाहून फार आनंद होतो. अलीकडे पुरुषांनी सुध्दा मानसिकता बदलली आहे, महिलांनी सुद्धा मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज स्त्री सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. आजची महिला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक यासोबतच उद्योग क्षेत्रात सुद्धा भरारी घेताना दिसून येते.

कर्तबगार स्त्रिया समाजाचे प्रेरणास्थान आहेत असे स्त्रीच्या कर्तृत्वाविषयी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ हितेंद्र धोटे यांनी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी डॉ. वैशाली बोरकर बोलताना म्हणाल्या की, स्त्री ही जगत जननी आहे. म्हणून तिचा सन्मान झालाच पाहिजे. स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही सामर्थ्यवान असेल तर समाज प्रगतीच्या दिशेने निश्चितच वाटचाल करेल. अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.भाग 2 ची विद्यार्थ्यांनी कु. याचना पवार हिने तर उपस्थितांचे आभार बी. ए. भाग 2 ची विद्यार्थ्यांनी कु. फातिमा शेख हिने मानले. या कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos