कसनसूर येथील नागरीकांनी जाळला नक्षल कमांडर महेशचा पुतळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथील नागरीकांनी नक्षलविरोधी घोषणा देवून कसनसूर एलओएस कमांडर महेश गोटा याचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला.
नक्षलवादामुळे तरूण पिढीचे नुकसान झाले आहे. शिक्षणापासून वंचित रहावे लागले. यामुळे आता नक्षल्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. आमचा पीएलजीए सप्ताहाला विरोध आहे. लोकशाहीवर विश्वास आहे. नक्षलवाद मुर्दाबाद, महेश गोटा मुर्दाबाद अशा घोषणा देत नागरिकांनी पुतळ्याचे दहन केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-06


Related Photos