महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज १० मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुन्यतिथी दिनानिमित्य सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव गोसावी प्रमुख पाहुने अजय वानखेड़े, घनश्याम वाळके सुनील लोखंडे व रमण गगापुरवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण दिपप्रज्वालित केले व सामूहिक अभिवादन केले.

अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना गोसावी म्हणाले की, सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारण्याचे काम केले. 

सावित्रीबाई यांनी जातीयता आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढा दिला. मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळ उभारली. कवयित्री असलेल्या सावित्रीबाईंनी समाजातील विषमता, भेदभाव, जातीय अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधात सातत्याने आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लढा दिला. महिलांना शिक्षण मिळावे, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळावी, हक्क मिळावा यासाठी सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागले आणि समाजातून बहिष्कृत व्हावे लागले. तरीही त्या कधीच खचल्या नाही, एवढे सहन करुण सावित्रीबाई यांचे वयाच्या 66 व्या वर्षी बुबोनिक प्लेगमुळे निधन झाले. त्यांचा वारसा आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे. सर्वानी त्यांच्या विचारावर चालने गरजेचे आहे. असे ते म्हणाले  प्रसंगी प्रमुख पाहुन्यानिही सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहीम पटेल यांनी केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos