महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचा गुजरात राज्यात अभ्यास दौरा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : समग्र शिक्षा, राष्ट्रीय आविष्कार अभियान (आरएए) सन २०२२-२३ - एक्सपोजर व्हिसिट आउट साईड स्टेट या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्हयातील आदर्श शाळांमधील निवडक २५ विद्यार्थी व ४ शिक्षक तसेच जिल्हा कार्यालयाचा एक प्रतिनिधी असे एकूण ३० विद्यार्थी व शिक्षक/प्रतिनिधी यांचा २८ फेब्रुवारी २०२३ ते ६ मार्च २०२३ या कालावधीत अहमदाबाद/वडोदरा (गुजरात) येथे शैक्षणिक अभ्यासदौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.

२८ फेब्रुवारी २०२३ रोजी शिक्षण सभापती, जि.प. भंडारा रमेश पारधी व शिक्षणधिकारी, प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासदौऱ्यासाठी शुभेच्छा देऊन रवाना केले.

या अभ्यासदौऱ्याच्या स्थळांमध्ये वस्तूसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय, तारांगण, वारसा इमारती, अभयारण्ये, माहिती प्रसार केंद्र, भौगोलिक-ऐतिहासिक स्थळे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी स्थळे, धरणे यासारख्या बाबींचा समावेश अपेक्षित होते. त्यानुसार अभ्यासदौरा कालावधीत गुजरात राज्यातील  साबरमती आश्रम, रुडाबाईची ५ मजली ऐतिहासिक बावडी, वैष्णोदेवी मंदिर, अक्षरधाम मंदिर, कंकारिया लेक व झू, अटल ब्रीज, सायन्स सिटी, नेचर पार्क, हॉल ऑफ सायन्स, हॉल ऑफ स्पेस, नेचर पार्क, रोबोटिक्स गॅलरी, एक्वाटिक गॅलरी, लाइफ सायन्स पार्क, प्लॅनेट अर्थ व सरदार सरोवर / स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडीया, एकता नगर) इत्यादी स्थळांना अभ्यासपूर्ण भेटी देऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक ६ मार्च २०२३ रोजी सकाळी भंडारा येथे सुखरुप परतले.

या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक, वैज्ञानिक, वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आनंदाची पर्वणी अनुभवता आली. या उपक्रमांबाबत लोकप्रतिनिधी, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos