साडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग


-  नराधमाला सावंगी पोलिसाचे अभय
-  तपासी अधिकारी  ताकीद यांचा आरोपीस वाचविण्याचा वाचविण्याचा प्रयत्न - पिडीतेच्या वडिलांचा आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
सावंगी पोलिस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी सावत्र बापाने चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सावंगी परिसरात राहणाऱ्या आरोपीने  दुसरा विवाह केला व दुसऱ्या पत्नीच्या  एका चार वर्षीय मुलीसोबत तो सावंगी मेघे येथे राहत होता . घटनेच्या दिवशी पत्नी बाहेर गेल्याचे पाहून आरोपीने त्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. याच दरम्यान पिडीत मुलीचे पहीले वडील भेटण्यास आले असता चिमुकलीने तिच्यावर घडलेला प्रकार सांगितला. यावरुन वडीलांनी सावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी किशोर सरोदे विरूद्ध कलम ३७६ भादवि नुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी सरोदे ला पोलीस  अभय देत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पोलिसात तक्रार दीली  या  कारणांमुळे सदर आरोपी  खुलेआम तक्रारकर्त्यांना  जिवे मारण्याचा धमक्या देत असुन पोलिस मात्र डोळे बंद करून बसले आहेत असा आरोप पिडीतेचे  नातेवाईक करित आहे. याकडे पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालावे  अशी मागणी होत आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-06


Related Photos