असगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  अवनी वाघिणीच्या शिकारप्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा अहवाल समोर आला असून शिकारी असगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी बेकायदा बंदूक वापरल्याचे समोर आले आहे. 
असगरने तीन कायद्यांचे उल्लंघन केल्याचेही या अहवालात म्हटले आहे.  भारतीय शस्त्रास्त्र कायदा Indian Arms Act 1958 च्या ३ (१), इंडियन व्हेटरनरी काऊंसिल ऍक्ट १९८४, वन्यजीव रक्षक कायदा १९७२ आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या Standard Operative Procedure चा भंग झाल्याचे मुद्दे या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.  अवनीला ज्या बंदुकीने ठार करण्यात आले ती बंदूक अजगरच्या मालकीची होती. असे असताना त्याच्या मुलाने शफाअत अली खानने कशी काय वापरल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांना सादर करण्यात आला आहे.  अवनीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर येईल तेव्हा इतर गोष्टी स्पष्ट होतीलच. या प्रकरणातला फॉरेन्सिक अहवालही लवकरात लवकर समोर आणला जावा अशीही मागणी होते आहे. अवनीचा शोध सुरु असताना ती शोध पथकाला दिसली. अवनी दिसताक्षणी तिला वन विभागाने जेरंबद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने पथकाच्या दिशेने चाल केली. ती दिसताच शार्प शूटर अजगर अलीने आणि त्याच्या मुलाने तिच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये अवनीचा जागीच मृत्यू झाला.  Print


News - Nagpur | Posted : 2018-12-06


Related Photos