महत्वाच्या बातम्या

 प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये स्त्रीचा मोलाचा सहभाग : डॉ. प्रशांत नारनवरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिथे महिलांच्या हातात सत्ता असते तो देश, ते क्षेत्र नेहमीच प्रगतीशील असते. सत्ता केवळ पुरुषांची असावी असा काहीसा गैरसमज असतो. परंतु स्त्रीच्या हाती सत्ता असली तर ती त्या संधीच सोनच करते व आपल्या क्षेत्रात आणखी प्रगती करुन आपल्या क्षेत्राला वरच्या स्थानावर नेऊन ठेवते. जिथे स्त्रीला मानच नसेल ते शासन सर्वसमावेशक आहे. हे आपण कसे म्हणू शकतो. आई ज्याप्रमाणे कुटुंबाची जोपासना करते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणमध्ये स्त्रीचा मोलाचा सहभाग असतो, असे प्रतिपादन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन  येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे होते तर अध्यक्ष म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, उद्घाटक म्हणून एसआरपीएफ च्या कमांडन्ट डॉ. प्रियंका नारनवरे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. छाया जनबंधू, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, चंद्रपूरचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम व  सहाय्यक संचालक वित्त व लेखा अधिकारी अतुल वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

आई पहिला गुरु असतो. आपल्या मुलांना ती संस्कारीत करते. याप्रमाणे संपूर्ण जग संस्कारीत आई पार पाडत असते, म्हणून प्रत्येकांच्या आयुष्यात महिलांची भूमिका फार महत्त्वाची असते, असे डॉ. प्रियंका नारनवरे म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. प्रियंका नारनवरे व डॉ. छाया जनबंधू यांच्या कर्तृत्वाला सलाम करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयातील महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. स्त्री पुरुष समानता सर्व देशभर पाळली जाते. त्यामुळे जागतिक स्तरावरील महिला दिन आज संपूर्ण देशभर साजरा केला जातो, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुकेशिनी तेलगोटे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली तर संचालन विशाखा गणोरकर तर आभार प्रदर्शन अंजली चिवंडे यांनी केले.  





  Print






News - Nagpur




Related Photos