कोरची येथे भव्य जनमैत्री मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका  प्रतिनिधी / कोरची :
उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरची पोलिस ठाण्याच्या वतीने येथील राजस्व भवनात १ ते ४ डिसेंबरपर्यंत जनमैत्री मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यामध्ये सदस्य नोंदणी, वैद्यकीय तपासणी करून आरोग्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सर्व आमंत्रितांच्या विनंतीनुसार देशभक्तीपर चित्रपट दाखविण्यात आला. यानंतर दररोज योगाभ्यास, परिसर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मेळाव्यादरम्यान तहसीलदार पुष्पलता कुमरे, सहाय्यक निबंधक डी.ए. सिरगाये, वैद्यकीय अधिकारी सचिन कवाडकर, कृषी अधिकारी कटारे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बी.एन. नारनवरे, नायब तहसीलदार व्ही.एस. शेडमाके, बाल विकास अधिकारी व्ही. आर. बुर्ले, कृषी सहाय्यक एस.एस. जाधव, संजय लांजेवार आदींनी आरोग्य, शासकीय योजना व त्यासाठी लागणारी कागदपत्रे, पेसा कायदा मार्गदर्शन बाबत सविस्तर माहिती दिली. ४ डिसेंबर रोजी भव्य नक्षलविरोधी शांता रॅली , नक्षलवाद व दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली. मेळाव्यास कुरखेडा उपविभागातील कोरची, बेडगाव, कोटगुल, पुराडा, मालेवाडा येथील शेकडो नागरीक सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-06


Related Photos