१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
यावर्षी विवाह ईच्छुकांसाठी  तुळशी विवाहानंतर पहिलाच मुहूर्त तब्बल २२ दिवसांनंतर येत असल्याने बुधवारी बहुतेक ठिकाणी लगीनघाई पाहायला मिळणार आहे . १२ डिसेंबरपासून लग्नाचे बार उडायला सुरुवात होणार आहे.    पुढच्या आठ महिन्यांत म्हणजे जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त असल्याने बोहल्यावर चढण्याची संधी आहे.
या वर्षी गुरूचा अस्त असल्याने ‘यंदा कर्तव्य’ असलेल्यांना तुळशी विवाहानंतर तब्बल २२ दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुहूर्तानुसार या महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. या महिन्यात ज्यांनी विवाह निश्चित केले आहेत, त्यांच्याकडे पत्रिका छपाई, वाजंत्री, मंडप, आचारी, बस्त्याची तयारी सुरू आहे. ५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत गुरूचा अस्त होता. मात्र १२ डिसेंबरपासून लग्नसमारंभांना सुरुवात होणार असून ते ११ जुलै २०१९ पर्यंत चालणार आहेत. यामध्ये एकूण ८३ विवाहाचे मुहूर्त असणार आहेत.

अशा आहेत तिथी

जानेवारी (9 मुहूर्त) – 2, 18, 19, 23, 25, 26, 27, 28, 29
फेब्रुवारी (11मुहूर्त) – 1, 8, 9, 10, 11, 15, 19, 21, 22, 24, 26
मार्च (14 मुहूर्त) – 2, 3, 8, 9, 10, 13, 14, 19, 22, 25, 27, 29, 30, 31
एप्रिल (10 मुहूर्त) – 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 26, 27, 28
मे (13 मुहूर्त) – 7, 8, 12, 14, 15, 17, 19, 21, 23, 26, 29, 30, 31
जून (15मुहूर्त) – 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 25, 26, 28
जुलै (3 मुहूर्त) – 6, 10, 11  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-06


Related Photos