महत्वाच्या बातम्या

 सैनिकी मुला मुलींच्या वसतिगृह प्रवेशाची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता ७१ आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात, युध्द विधवांच्या व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. जागा उपलब्ध असल्यास सर्व साधारण नागरिक पाल्यांना सुध्दा प्रवेश देण्यात येणार आहे.

ज्या आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना तसेच युध्द विधवांचे आणि सर्व साधारण नागरिकांचे पाल्य आणि अन्य नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत आणि ते या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिकी मुलीचे वसतिगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथून ५० रुपयांचा प्रवेश अर्जाचा नमूना व माहिती पुस्तिका घेवून ३१ मे २०२३ पर्यंत माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याच्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतीसह माजी सैनिकी मुलांमुलींचे वसतिगृहात जमा करावे, असे आवाहन मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos