महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर शहरातील ज्वलंत प्रश्नांवर मुख्याधिकारीना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन मुख्याधिकारी, नगरपरिषद यांना बल्लारपूर मधील सुधीर जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि नं. चंद्रपूर 0000113/2022 ( सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर) यांना निवेदन दिले.

जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे सुधीर मुनगंटीवार वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्यें मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री गोंदिया व चंद्रपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मधील ज्वलंत प्रश्न घेऊन नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले गेले त्यात उन्हाळ्यात सुरु होताच पाण्याची समस्या उदभवतो. त्यामुळे शहरातील सर्व हातपंप त्वरित दुरुस्त करणे. तसेच शहरांत पाण्याची कमतरता कुठेही पडू न देणे. 

तसेच शहरातील सर्व भटके कुत्रे व मोकाट गाय चे योग्य ती व्यवस्था करून देणे. कुमारी आराध्या आशिष मानकर या 6 वर्षीय चिमुकल्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. तिला चावा घेतलेल्या गालावर एकूण 19 टाके लागले असून, अशी घटना पुन्हा- पुन्हा घडू नये म्हणून योग्य ती कारवाई करावी.

विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद यांनी सर्व मागण्या गंभीरतेने ऐकून घेतले व तातडीने संबधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. निवेदन देताना सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, माजी नगरसेवक स्वामी रायबरम, सुधाकर सिक्का, नारायण अण्णा, कमल वर्मा, श्रावण शिवणकर आदी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos