महत्वाच्या बातम्या

 राज्याचा अर्थसंकल्प आपले सरकार भूमिकेला अभिप्रेत : माजी मंत्री राजकुमार बडोले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : राज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार आपले सरकार भूमिकेला अभिप्रेत असून केंद्र सरकारच्या पाऊला वर पाऊल टाकत शेतकरी वर्गासाठी किसान सन्मान निधी राज्य सरकार तर्फे सुरू करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. सोबतच १ रुपयात पिकांचा विमा उतरवता येणार असल्याने शेतकऱ्यांची खासगी विमा कंपनी कडून होणारी लुटमार थांबेल. मुलीचा जन्म झाल्यास ५ हजार आणि मुलगी १८ वर्षाची होताच ७५ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.

सोबतच महिलांना एस टी प्रवासात ५० टक्के सूट, आशा सेविकांचे मानधन ३ हजार ५०० हजार वरून ५ हजार रुपये करून महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार ने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे. संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य १ हजार वरून १ हजार ५००  केल्याने निराधार नागरिकांना याचा लाभ होणार आहे.





  Print






News - Gondia




Related Photos