महत्वाच्या बातम्या

 महिला दिनाचे औचित्य साधून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण तरुणांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था आलापल्ली द्वारा संचालित लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अहेरी येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र लोक सेवा आयोग ची परीक्षा उत्तीर्ण तरुण अहेरी शहराचे नाव लौकिक करणारे विद्यार्थी हर्षल पोलशेट्टीवार, आदित्य सड़मेक यांचा सत्कार करण्यात आला. 

एमपीएससी द्वारा घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक व सहाययक कक्षाधिकारीची परीक्षा हर्षलनी उत्तीर्ण केली असुन दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्कची परीक्षा आदित्य ने उत्तीर्ण केले. त्याचबरोबर सुहासिनी बोधे बिडीएस झाल्याबद्दल संस्था मार्फत सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी संस्था अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार, लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे शिक्षक विनोद दहागावकर, सतीश पनकंटीवार, शुभम नीलम, धर्मराव कृषि विद्यालयाचे गणित शिक्षक आतिश दोतुलवार यांच्या हस्ते सर्व उत्तीर्ण झालेल्य विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी हर्षल पोलशेट्टीवार व आदित्य सडमेक यानी अभ्यास कसा करावा, वेडेचे नियोजन, ध्येय गाठायला काय करावे लागते. यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले, डॉ. सुहासिनी यांनी आरोग्य कसे चांगले ठेवून अभ्यास करावा यावर मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी संस्था अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार यांच्या सह प्रमुख पाहुणे आतिश दोतुलवार, एडवोकेट पंकज दहागावकर यानी मनोगत मांडले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अश्विन मडावी व सूत्रसंचालन विद्यानी कोसरे हीने केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos