महत्वाच्या बातम्या

 महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल यांच्या वतीने ८ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मपोउपनि वर्षा नैताम, भरोसा सेल यांनी आपले प्रास्ताविकात गर्भातील स्त्री याविषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी उपस्थित महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षा वर्षा मनवर यांनी बालकांवरील संस्कार तसेच महिलांना आजच्या युगात कस उभ रहायचे यावर मार्गदर्शन केले तर डॉ. रोशनी किरंगे यांनी महिलांचे आरोग्य व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पुर्वा तारे यांनी स्त्री-पुरूष समानता आणि महिलांनी आर्थिक बाबीवर ज्ञान घेतले पाहिजे या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थित महिला व शालेय विद्यार्थीनीना महिला दिनाच्या शुभेच्छा दिले तर दिव्या चिता यांनी स्त्रियाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी अभियोक्ता पल्लवी केदार यांनी महिलांविषयक कायदेबाबत मार्गदर्शन केले. तर वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार यांनी सुध्दा महिलांविषयी आत्मविश्वास किती मोलाचा असतो. या विषयी मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रमाकरीता समुपदेशीका वशाली बांबोळे, मिसेस इंडिया- २०२१ मनीषा मडावी, प्रोफेशनल इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट शितल मेश्राम (कोसे), मसपोनि रूपाली पाटील, मसपोनि पुनम गोरे, मपोउपनि संघमित्रा बांबोळे, वर्षा भुसारी, राजेश्री गोहणे, भरोसा सेल येथील महिला संफा लिला सिडाम, मपोहवा शेवंता दाजगाये, मोहवा लक्ष्मी विश्वास, मपोना पुष्पा कन्नाके, मपोना सविता उसेंडी, मपोना वत्सला वालदे व मपोशि सोनम जाभुळकर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस मुख्यालयातील सर्व महिला अंमलदार, उपस्थित होते. 

जागतिक महिला दिनाचा आयोजित कार्यक्रमास कार्यालयातील महिला, शालेय, महाविद्यालयीन विद्याथांनी उपस्थित होते. उपस्थित महिला, शालेय विद्यार्थीनीचे भरोसा सेल येथील प्रभारी अधिकारी मपोउपनि वर्षा नैताम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून सर्व महिला व शालेय विद्यार्थीनीना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, उल्हास भुसारी यांचे तर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा दिले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हाभरातील सर्व महिला व शालेय विद्यार्थीनीना जागतिक महिला दिनाचा शुभेच्छा दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos