महत्वाच्या बातम्या

 फॅक्टरीच्या दूषित व रसायनयुक्त पाण्यामुळे होणाऱ्या प्रदुषणा विरोधात उद्या आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर जवळील बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व रसायनयुक्त पाण्यामुळे होणाऱ्या प्रदुषण विरोधात उद्या उलगुलान संघटन तर्फे बामणी टी पॉइंट येथे आंदोलन करण्यात येत आहे.

बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीचे दूषित पाणी भागरती नाल्याच्या प्रवाहात वाहत असल्याने आजूबाजूच्या शेती व जनावरांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या बाबत प्रशासनला निवेदन देऊनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे उद्या १० मार्चला सकाळी ११ वाजता उलगुलान संघटनेचे राजु झोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. 

नाल्याच्या प्रवाहात रसायनयुक्त पाणी वाहत असून जनावरांना पाणी पिण्यास अयोग्य आहे. तसेच शेतकऱ्यांना ओलीत शेती करण्यास सुध्दा हानिकारक झाले आहे. या बाबत प्रशासनाला प्रदुषण दूर करून समस्या सोडावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण सदर मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उलगुलान संघटनेचे राजु झोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी आंदोलन करणार आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos