महत्वाच्या बातम्या

 पेरमिली येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते महिला दिन कार्यक्रमाचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : पेरमिली येथील पटवारी भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बचत गट महिला प्रभाग संघ पेरमिली यांच्या मार्फतीने ८ मार्च २०२३ रोज बुधवारला जागतिक महिला दिनाचे आयोजित करण्यात आले होते.  

सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला उमेद गटाचे १७० महिला बचत गट उपस्थित होते. 

महिला दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आले असून महिलांवरील अन्याय, अत्याचार याबाबत तसेच महिलांच्या विविध अडचणी, काम करत असताना येणाऱ्या समस्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मंचावर उपस्थित पेरमिलीचे सरपंचा किरण नैताम, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संच प्रमुख तसेच १७० महिला बचत गटांचे पदादीकारी व महिला सदस्य उपस्थिती होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos