महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात उद्या साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागतर्फे साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन मी साहित्यिक कसा झालो? या विषयावर उद्या सकाळी ११.०० वाजता गोंडवाना विद्यापीठ सभागृह येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक ना .गो .थुटे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची उपस्थिती राहणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos