महत्वाच्या बातम्या

 इंदाराम येथे जागतिक महिला दिन साजरा


- अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील बुधवार ८ मार्च २०२३ ला गडचिरोली पोलीस दलाच्या विद्यामाने पोलीस स्टेशन अहेरी तर्फे जागतिक महिला दिना निमित्त इंदाराम कस्तुरीबा गांधी बालिका महाविद्यालय येथे भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील व गावातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या विविध अडचणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली . तसेच महिलादिना निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले.

सदर महिला दिना निमित्त अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ. प्रियंका देशमुख व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून अनुष्का ठाकूर उपस्थित होते.

यावेळी किशोर मानभव पोलीस निरीक्षक अहेरी, पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, वर्ष पेंदाम सरपंच ग्रामपंचायत इंदाराम, मडावी आरोग्य सेविका, शालीनी कांबळे ग्रामपंचायत सदस्य इंदाराम, कविता सोयाम ग्रामपंचायत सदस्य इंदाराम, जयाबाई तेलंगे सदस्य ग्रामपंचायत इंदाराम, सपना कोरेत, प्राचार्य दीपिका धवस, रोशनी नवरेती शिक्षका, प्रतिभा ढवळे शिक्षिका, हर्षालीनी उराडे शिक्षिकासह आदि उपस्थिती होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos