महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर


- जागतिक महिला दिनी विद्या बोकारे यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात  कार्यरत कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी डे केयर सेंटर महिला दिनाचेऔचित्य साधुन सुरू करण्यात आले आहे. विद्या बोकारे  यांच्या हस्ते आज या डे केयर सेंटर चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्या बोकारे, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वाले उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे विद्यापीठात कर्तव्यावर कार्यरत असताना त्यांच्या पाल्यांची गैरसोय होऊ नये या उद्दात्त हेतुने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून विद्यापीठात डे केयर सेंटर स्थापित करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अर्धांगिनी डॉ.विद्या बोकारे डे केयर सेंटर च्या उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या, मुलांची काळजी असली की अर्ध लक्ष हे घरीच असतं कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना डे केअर सेंटर मध्ये ठेवल्यास त्यांच्या मुलांना आई बरोबर विद्यापीठात आल्याचा आनंद होईल. या मुलांना सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस बागेत नेल्यास तसेच मुलांना पानांचा स्पर्श करायला लावल्यास त्यातूनही नवा आनंद मुलांना घेता येईल असे त्या म्हणाल्या. या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले,  पुरुष कर्मचाऱ्यांनी आपली मुलं चार तास डे केयर सेंटर मध्ये ठेवली तर मुलांंची आई  आपलं शिक्षण पूर्ण करू शकते. आणखीन नवनवीन प्रयोग या सेंटर मध्ये करता येईल. मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरी कुणीही नसल्याने अनेक कर्मचार्‍यांना काम सांभाळताना कसरत करावी लागते.

यामुळे महिला कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडत असते. असे ते म्हणाले या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि विद्या बोकारे यांच्या कडून पाच हजार रुपयांची देणगी डे केयर सेंटर साठी जाहीर करण्यात आली. यावेळी डॉ. शिल्पा आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. संतोष सुरडकर तर आभार डॉ. प्रिया गेडाम यांनी मानले. सध्या पाळणा घरात चार ते पाच बालके आहेत .आगामी काळात ही संख्या आणखी वाढेल असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला तसेच डे केयर सेंंटर सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी डे केयर सेंटरच्या आयांचा यावेळी सत्कार करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos