महत्वाच्या बातम्या

 मालगाडीचा डबा रुळावरून घसरला : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : दक्षिण कडून येणाऱ्या मालगाडीचा एक डबा रुळावरून खाली घसरल्याची ची घटना बल्लारशाह रेल्वे स्थानक वर सोमवारी रात्री ९.३० चा सुमारास घडली.

चारचाकी वाहन वाहून नेणारी २५ कोचची मालगाडी दक्षिणेकडून नवी दिल्ली ला जात होती. बल्लारशाह फलाट क्रमांक ५ वर रेल्वे यार्ड मध्ये येताच ९५४०२६ चा डबा रुळावरून खाली उतरला. त्यामुळे मालगाडी जाग्यावरच थांबली. ही सूचना मिळताच रेल्वे प्रशासन चे अधिकरी घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. या घटनेमुळे दक्षिण कडून येणारी रेल्वे वाहतूक खोळंबली. रेल्वेच्या वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यात आली असून रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामी लागले.





  Print






News - Chandrapur




Related Photos