व्याहाड (बुज.) येथील ग्रामविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
ग्रामपंचायत भवन बांधकामाचे मोजमाप करून देयक काढून देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी व्याहाड बुज. येथील ग्रामविकास अधिकारी संदीप सब्बनवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार व्याहाड बुज. येथील रहिवासी असून कंत्राटदार आहे. व्याहाड बुज. येथील ग्रामपंचायत भवन बांधकाम जनसुविधा योजनेअंतर्गत मुळ कंत्राटदाराच्या वतीने तक्रारदाराने काम केले. सदर काम स्लॅब पर्यंत झाले. झालेल्या कामाचे मोजमाप करून पुस्तीकेप्रमाणे तयार करून मोजमाप करून ग्रामपंचायतीमध्ये सादर केले. ३ लाख ८४  हजार रूपयांचे देयक मुळ कंत्राटदाराला प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करणारे कंत्राटदार हे करीत असल्याने व्याहाड बुज. येथील ग्रामविकास अधिकारी संदीप सब्बनवार यांनी तक्रारदारास मिळालेले देयक काढून देण्याचा मोबदला म्हणून चार हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रादारास संदीप सब्बनवार याने मागणी केलेली रक्कम देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज ३ डिसेंबर रोजी ग्रामविकास अधिकारी सब्बनवार याला साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. सावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे, नापोकाॅ पुरूषोत्तम चैबे, महेश मांढरे, सुभाष गोहोकर, अजय बागेसर, पोशि रविकुमार ढोंगळे, चालक शिपाई राहुल ठाकरे आदींनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-04


Related Photos