आता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणी करण ( cerfication ) व प्रमाणन ( Accreditation) राज्यातील सर्व ( खाजगी  / शासकीय व इतर)  मत्स्यबीज  उत्पादन केंद्रे, संगोपन /संवर्धन केंद्रे, मत्स्यजीरे , मत्स्यबीज, मत्स्यबोटूकली, नॉप्लीया, पोस्टलार्व्हा, मत्स्यप्रजनक यांचे संवर्धन /संगोपन इत्यादी सर्वासाठी लागू राहील.

 शासनाने मत्स्यबीज उत्पादन केंद्र / संवर्धन केंद्र ज्यामध्ये विविध प्रजातीच्या माशांचे जसे भारतीय प्रमुख   कार्प इतर कार्प, परदेशातून आयात केलेल्या प्रजाती असे एकूण संवर्धनक्षम सर्व मासे ,गोडया तसेचे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी , शोषभिवंत मासे याचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक साठवणूक तळी  संवर्धन व संगोपन तळी , संवर्धन व संगोपन तळी तसेच गोडे पाणी व खाऱ्या पाण्यात मत्स्य/कोळंबी/ इतर  जलचर प्रजाती यांचे संवर्धन व संगोपन करणारी उत्पादन केंद्र/ संवर्धन केंद्रे यासाठी नोंदणीचे दृष्ट्टीने पथदर्शक मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत.    त्यानुसार राज्यातील सर्व संगोपन /संवर्धन केंद्राची नोंदणी होणे बंधनकारक आहे. मात्र केंद्रीय तटीय जलकृषि यांचे कार्य क्षेत्रातील संवर्धन /संगोपन केंद्रानी अथवा मत्स्यशेती साठी मत्स्ययशेतीसाठी त्यांचेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

 केंद्रशासनाच्या दिलेल्या निर्देनुसार राज्य्‍ स्तरावर मत्स्यबीज प्रमाणीकरण व मत्स्यबीज केंद्राचे प्रमाणन करणेसाठी समिती गठीत करण्यात येणार आहे.  या समितीची कार्यकक्षा ही मत्स्यसंवर्धन केंद्रातून निर्मित होणारे गुणवत्ता असलेले बीजांचे उत्पादन व केंद्राची उत्पादकता यांचे राज्यभर संनियंत्रण करणे अशी राहील . याच बरोबर बीज उत्पादन व त्याची गुणवत्ता  याचे सनियंत्रण करेल.  सबब ज्या उद्योजकांना संवर्धनक्षम देशी व विदेशी प्रजाती जसे कार्प, एअर ब्रिदींग फिश, गोडया व निमखाऱ्या  पाण्यातील कोळंबी, इतर संवर्धनक्षम प्रजाती , शोभीवंत माशांच्या प्रजाती इत्यादीसाठी राज्य शासनाच्या मत्स्यबीज प्रमाणीकरण व मत्स्यबीज केंद्राचे प्रमाणन करणाऱ्या समितीची प्रथम मान्यता घेणे बंधनकारक राहील.  तसेच संगोपन / संवर्धन/ साठवणूक तलावामध्ये गोडेपाणी अथवा निमखाऱ्या पाण्यातील प्रजातीचे संवर्धन / संगोपन करण्यासाठी तसेच विविध प्रजातीच्या वापरासाठी राज्यातील मत्स्यबीज प्रमाणीकरण व मत्स्यबीज केंद्राचे प्रमाणन करणाऱ्या राज्यस्तरीय शिखर समितीची मान्यता घेणे बंधनकारक आहे.  केंद्र शासनाच्या मत्स्यबीज प्रमाणीकरण व मत्स्यबीज केंद्राचे प्रमाणन प्रणाली 2015  नुसार जसे या  प्रणालीनुसार नोंदणी नसलेल्या मत्स्यबीज केंद्राचे अस्तित्व बेकायदेशिर ( NULL & VOID ) ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील सदर  प्रणाली अंतर्गत नोंदणी न केल्यास संवर्धकाचे अस्तित्व  हे बेकायदेशीर राहील.  गडचिरोली जिल्हयातील सर्व मत्स्यपालन सहकारी संस्था  (खाजगी/शासकीय/इतर) मत्स्यबीज उत्पादन केंद्रे, संगोपन/ संवर्धन केंद्रे, मत्स्यजीरे, मत्स्यबीज, मत्स्यबोटूकली, नॉप्लीया, पोस्टलार्व्हा, मत्स्यप्रजनक यांचे संवर्धन/ संगोपन इत्यादीना प्रमाणीकरण व प्रमाणन करुन योग्य गुणवत्ता असलेले मत्स्यबीज  व मत्स्योत्पादन घ्यावे असे आवाहन गडचिरोली जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त तथा राज्यस्तरीय मत्स्यबीज प्रमाणीकरण  व मत्स्यबीज केंद्राचे प्रमाणन सदस्य-सचिव प्रशांत वैद्य यांनी केले.  तसेच त्यांचे अधिनस्त सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे व सचिन कुरकुटे यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित संस्था व संबंधितांना माहितीस्तव कळविले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-04


Related Photos