चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचाऱ्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वीज निर्मीती केंद्रातील कुणाल एंटरप्राइजेस या कंत्राटी कंपनीत कार्यरत कामगाराला वाघाने ठार केल्याची घटना समोर आली आहे.
चंद्रपूर वीज केंद्र परिसरात ही घटना घडली आहे. भोजराज मेश्राम (वय ५८, रा. वैद्यनगर तुकूम) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बुधवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान काम आटोपून सायकलने घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यात वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला व उचलून नेले. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाला. त्यांची सायकल रस्त्यावर पडून होती.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघ फिरत आहे. याबाबत २ दिवसांपूर्वी वीज केंद्राने वनविभागाला माहिती दिली होती. दरम्यान, वाघाने कामगाराचा ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
News - Chandrapur | Posted : 2022-02-17