महत्वाच्या बातम्या

 लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा येथे नेत्ररोग शस्त्रक्रिया शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : ३ व ४ मार्च रोजी लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा येथे सोलापूर येथील डॉ. विरेंद्रकुमार व डॉ. अनुराधा अवस्थी यांचा मोतीबिंदू तसेच इतर नेत्ररोग शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. यामध्ये लोक बिरादरी प्रकल्प दवाखान्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंत आमटे व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनघा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय शिबिरामध्ये ६५ रुग्णांवर फॅको तंत्रज्ञानाने म्हणजे अतिसूक्ष्म छीद्राद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये लोक बिरादरी प्रकल्प दवाखाण्याचे नेत्र विभागाचे सहाय्यक जगदीश बुरडकर व दवाखाना कर्मचार्यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. सोलापूरहून नवल येमूल, नरेश कडगी, करूण माने, बसवराज कल्ले, स्वप्नील कदम, मेरी केरुलवार, मात येलगुंडे, विद्या नायनिरगुडे, पूजा वाघमारे यांचा सहभाग होता. 

लोक बिरादरी प्रकल्प पंचक्रोशीतील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून असे शिबीर नियमित आयोजित करत असून रुग्णांनी रुग्णालयापर्यंत पोहचून शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. दिगंत आमटे यांनी यावेळी केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos