देसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश


-जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
 येथील  बहुचर्चित  बहुप्रतिक्षित बस थांब्याचा प्रश्न आमदार  कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने अखेर मार्गी लावण्यात यश आले असुन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने येथील बस थांब्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
 देसाईगंज शहर गडचिरोली जिल्ह्यातील  एकमेव  रेल्वे स्टेशन असलेले शहर असुन लगतच्या चारही  जिल्ह्यांना जोडणारा  महत्त्वाचा  दुवा आहे.  असे असताना गेली अनेक वर्षांपासून येथील बस थांब्याचा प्रश्न जैसे थेच असल्याने एस.टी. बसेस चक्क मुख्य रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात येत असल्याने  रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस  गंभीर बनू लागला होता. 
 आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन  व येथील  समस्या  अवगत करून देऊन येथील बस आगाराचा प्रश्न मागीं लावण्यात यश मिळवले असून  नुकताच आगारासाठीची जागा महाराष्ट्र राज्य  परिवहन मंडळ गडचिरोली विभागाला हस्तांतरीत करण्यात आल्याने येथील बस आगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 सदर जागा हस्तांतरित करण्या संदर्भाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेश  क्रमांक कायां-३/अकाज-१/सं.क्र./कावि/२०१७/२०१८ दि. २१ ऑगस्ट २०१८  अन्वये  मौजा देसाईगंज  येथील एस.टी. बसस्थानक  बांधकामाकरीता विभाग नियंत्रक , राज्य परिवहन महामंडळ  गडचिरोली विभाग यांना नझुल खसरा क्रमांक २४/५ मधील खुला खंडकापैकी क्षेञ ६१२० चौ.मी. जमिनीचा आगाऊ ताबा देण्याबाबत आदेश पारित करण्यात आला होता. तद्वतच उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांचे पञ क्र.उविअ/ सिरस्तेदार /अका/कावि/२६४५ /२०१८ दि. २९ ऑगस्ट २०१८ नुसार  जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशानुसार  विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांचे कडुन पारित आदेशातिल रक्कम शासन  खजिना दाखल करुन  सदर जागेचा आगाऊ ताबा देण्याबाबत कळविले होते. त्या अनुषंगाने  विभाग नियंत्रक यांनी मौजा देसाईगंज येथील नझुल खसरा क्रमांक २४/५ मधील खुला खंडकापैकी  क्षेञ ६१२० चौ.मी.जमिनीची अनुज्ञेय रक्कम  रु१ करोड  २४ लाख २३ हजार सहाशे रुपये  दि.३ नोव्हेंबर  २०१८ अन्वये शासन जमा करून खजिना दाखल केला आहे.  मा. नगर रचनाकार गडचिरोली  यांचे पञ क्र.  आरक्षण  क्रमांक  १६ पैकी आयटिआय कार्यालयाच्या मागील बाजूस पश्चिम उत्तर  कोप-यातील सुमारे  २०२५ चौ.मी.क्षेत्र पेट्रोल पंप प्रयोजनाथ॔ वगळण्यात आले असून  ते क्षेञ वगळून  राज्य परिवहन विभागास आवश्यक  क्षेत्रफळाचा ताबा अटी व शथिंच्या अधिन राहुन  मंजूर करण्यास नाहरकत प्रमाणपत्र  देण्यात आले आहे व उपविभागीय अधिकारी  देसाईगंज यांनी निर्देशित केल्यानुसार दि. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजता मोक्यावर मोजणी क्र. क प्रत नुसार  आगाऊ  ताबा  देण्यात आला आहे. 
 यावेळी  ताबा देणार उपविभागीय अधिकारी देसाईगंज तहसीलदार  डि.टी. सोनवाणे,  ताबा घेणार विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोलीचे वाडिभस्मे, विभागीय अभियंता राहुल मोडक, इमारत निरिक्षक पराग अंबादे, स्थापत्य  शाखा लिपिक प्रमोद चौधरी, भु.सं.अधिकारी आर.डी. डोंगरे, नगर परिषद उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-03


Related Photos