बेपत्ता असलेल्या युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह : एटापल्ली येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
शहर प्रतिनिधी /  एटापल्ली :
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि घटना एटापल्ली शहरातील वॉर्ड क्र ७ मध्ये आज ३ डिसेंबर रोजी उघडकीस आली .  साईनाथ राजाराम वसाके (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे .  
एटापल्ली शहरातील वॉर्ड क्र ७ मधील रहिवासी असलेला मृतक साईनाथ राजाराम वसाके १ डिसेंबर रोजी पहाटेच्या कुणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडला . दोन दिवसांपासून तो घरी न परतल्याने मृतकाच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणे सुरु केले . आज अचानक त्याचा मृतदेह घरा शेजारील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली .  या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाला बाहेर काढून पंचनामा केला. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पुढील तपास एटापल्ली पोलीस करीत आहेत . 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-12-03






Related Photos