देशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार


-  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची वाढती संख्या बघून त्यांना पासपोर्ट मिळणे सोयिस्कर होण्याच्या उद्देशाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत देशात आणखी १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार असून यात राज्यातील १६ नवीन कार्यालयांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
प्रेस क्लबच्या पत्रकारांशी संवाद या कार्यक्रमात ते  बोलत होते. यावेळी नागपूरचे पासपोर्ट अधिकारी सी. एल. गौतम उपस्थित होते.
 डॉ. मुळे म्हणाले की, वर्ष १९४७ ते २०१४ या काळात देशात ७७ पासपोर्ट कार्यालये होती. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर कार्यालयांचा समावेश होता. वर्षांला ५ ते ६ कोटी नागरिक  पासपोर्टसाठी अर्ज करत असल्याचे पाहून केंद्राने पहिल्या टप्प्यात नवीन १६ कार्यालये सुरू केली. नंतर जिल्हा स्तरावर हे कार्यालय सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी पोस्ट खात्यासोबत सार्वजनिक, खासगी तत्त्वावर या कार्यालयांचा प्रस्ताव पुढे आला. देशात या पद्धतीने २३८ नवीन कार्यालये सुरू झाली असून त्यातील महाराष्ट्रात १६ कार्यालये आहेत.  
अमरावतीलाही कार्यालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती  डॉ. मुळे यांनी दिली .    Print


News - Rajy | Posted : 2018-12-03


Related Photos