बस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नांदेड : 
बस व ट्रकची समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २५ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना नांदेड-नागपूर महामार्गावर आसना पूलाजवळ आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . सर्व जखमी प्रवाशांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे .
प्राप्त  माहितीनुसार, नांदेडहून येणाऱ्या नांदेड-पुसद एम.एच.२० बी.एल.१७४० या क्रमांकाच्या बसला नांदेडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जब्बर धडक दिली. यामध्ये बसमधील २५ हून अधिक प्रवासी जखमी झालेत. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. सर्व जखमी प्रवाशांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे .  Print


News - Rajy | Posted : 2018-12-03


Related Photos