गडचिरोली तालुका कोतवाल संघटनेतर्फे १५ व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन सुरूच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
१९ नोव्हेंबर  पासून आयुक्त कार्यालय नाशिक येथे महाराष्ट्रातील कोतवालांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून त्या मोर्चात गडचिरोली तालुका कोतवाल संघटना सहभागी असून कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी मिळण्याची मागणीसाठी  महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना गडचिरोली शाखेतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे . या कामबंद आंदोलनास १५ वा दिवस सुरु आहे . 
कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून कोतवाल पाठपुरावा करीत आहे.त्यासाठी सरकारने समित्याचीही नेमणूक केली होती परंतु सरकारने आश्वासने देऊन अघ्यापही एकही मागणी मान्य केलेली  नाही. कोतवालांना सध्या दरमहा पाच हजार रुपये मानधान देऊन कोतवालाकडून ८ तास काम करून घेत आहे. कोतवालांना सहाव्या वेतन आयोगानुसार १४ हजार ९६९ रुपये वेतन मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने केली आहे.या मागणीसाठी राज्यातील कोतवालांनि बेमुदत कामबंद आंदोलन नाशिक येथील आयुक्त कार्यालयावर सुरु आहे.या आंदोलनात सहभागी होऊन गडचिरोली तालुका कोतवाल संघटनेतर्फे तहसील कार्यालयसमोर आंदोलन सुरु केले आहे .   
 यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश दरो, सचिव सत्यवान भोयर, उपाध्यक्ष किशोर मडावी, सहसचिव कविता ठवरे, कोषाध्यक्ष प्रफुल ठाकरे, सरचिटणीस चरण कनाके ,निकेश लेनगुरे, राजू उईके, रुपाली खोब्रागडे, सुजाता शेंडे, स्नेहा कुमरे, प्रमोद गेडाम, साधना लोणारे, यामीन सहारे, यामिनी शेडमके, कल्यानी दमबाजी, जेनगते अलाम, स्वप्नील उंदिरवाडे, प्रेम अंबादे, महेश कुलमेथे, भक्तदास भणारकर, पपिया धांनफोले, गवतम ढवळे, मारोती उसेंडी, विराठ गोटा, झेम मेश्राम, भाग्यश्री गावडे, निशा शिडाम, मीनाक्षी लडके, प्रिया उरकुडे, ज्योती नरोटे, कालिदास गावडे, तालुका संपर्क प्रमुख उत्पल खेवले आदी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-03


Related Photos