शिक्षणा बरोबरच खेळणे सुध्दा विद्यार्थ्यांचे हक्क : डॉ. इंदुराणी जाखड


-खमनचेरु शाळेत प्रकल्पस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक मोहत्सवाचे उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
आदिवासी विकास विभाग एकात्मीक आदिवासी प्रकल्प अहेरी अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन खमनचेरु येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या प्रांगणात  करण्यात आले आहे .या मोहत्साचे उदघाटन् २ डिसेंबर रोजी  गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ.मोहीत गर्ग यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीच्या  प्रकल्प अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड होत्या. तर सहउदघाटक म्हणून अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय बंसल, प्रमुख उपस्थिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रजीत शिंदे, सीने कलाकार चीरंजीव गड्डमवार, सरपंचा मंजुळा आत्राम, जि.प.सदस्या सुनीता कुसनाके, उपसरपंच रमेश मडावी, शाळा व्यवस्थापण समीतीचे तुळशिराम मडावी, संतोष गव्हारे, मनिला मडावी, रधी गज्जलवार, गुरुदास मडावी इत्यादीची होती .
 शिक्षणहक्क कायद्याने सर्व मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार तर आहेच पण शिक्षणा बरोबरच त्याना खेळण्याचा सुध्दा अधिकार आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी उपयोग करुन घ्यायला हवा असे आवाहन साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डाॅ.इंदुराणी जाखड यांनी केले. खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सर्व कला कौशल्याचे सादरीकरण केले जाते. विद्यार्थीना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होत असते. शिक्षण, कला व खेळ या तीनही गोष्टीतून विद्यार्थीचा सार्वांगीन विकास केल्या जावू शकतो. म्हणूनच आदिवासी शिक्षण विभाग आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यां करीता शिक्षणा बरोबरच खेळ व सांस्कृतिक स्पर्धा घेत असते यात जास्तीत जास्त विद्यार्थीनी सहभागी व्हायला हवे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थीना प्रोत्साहीत करावे असेही डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
 कार्यक्रमाचे उदघाटक डाॅ.गर्ग व सह-उद्घाटक अजय बंसल यांनीही उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. पोलिस विभाग आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी राबवीत असलेल्या योजनांची माहिती त्यानी दिली व याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यानी केले.
 या तीन दिवसीय क्रिडा व सांस्कृतिक मोहत्सवात खमनचेरु, बामणी,जिमलगट्टा व मुलचेरा येथील चार केंद्रातील सव्वीस शाळेतील सहाशे नव विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती प्रास्ताविकातून साहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार यांनी दिली.
 यावेळी चारही केंद्रातील विद्यार्थीनी मतदान जनजागृती ,दुष्काळ, अंधश्रध्दा, शिक्षण हक्क व आदिवासी संस्कृती या विषयावर झाॅकी सादर केल्यात. 
कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनील पोटे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार प्राचार्य नन्नेवार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी खमनचेरु शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक , प्रकल्पातील सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी व प्रकल्प कार्यलयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मीळाले. या स्पर्धेचे बक्षीस वितरन कार्यक्रम आदिवासी विकास,वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक ४ डीसेंबरला केल्या जाणार आहे.

या उदघाटन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते मराठी सीनेअभीनेता

 हनुमंतू रिक्षावाला  फेम चीरंजीवी गड्डमवार त्यानी दुर्गम भागातील भामरागड तालुक्यातील पेरमीली येथील आश्रम शाळेत शिक्षण घेतले. आश्रम शाळेत शिक्षण घेत असताना केलेला संघर्ष  आलेल्या अडचणी व त्यावर मात करुन मीळविलेले यश याबाबतची माहिती त्यानी उपस्थितीतांना दिली. गरिबी हा काही शाप नाही. गरिबीतून सुध्दा आपल्याला पुढे जाता येते त्याकरीता जीद्द व मेहनत आवश्यक आहे. असेही चिरंजीवी यांनी सांगितले. यावेळी अभीनेता चिरंजीवी गड्डमवार यांचा आदिवासी विभागातर्फे  सत्कार करण्यात आला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-03


Related Photos