महत्वाच्या बातम्या

 आज गडचिरोली जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. गडचिरोली र. नं. 103 ची सार्वत्रीक निवडणूक गडचिरोली येथील पोटेगाव रोडवरील रामनगरच्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथ शाळा तसेच अहेरी येथील आझाद चौकातील ग्रामीण रुग्णालगतच्या गृहलक्ष्मी म. ना. सह पतसंस्था येथे सकाळी 8 वाजे पासुन ते दुपारी 4 वाजे पर्यंत पार पडणार आहे. निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत परीवर्तन पॅनल विरुद्ध सहकार्य पॅनल अशी होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सहकार क्षेत्रातील २०२० ला होणाऱ्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आता शासनाच्या परिपत्रक व शासन निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील निवडणूका घोषित केल्या असून गडचिरोली जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित   मंडळाची निवडणूक आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पार पडणार आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व साधारण प्रवर्गातुन लिपिक संवर्गाचे धनंजय दुम्पेट्टीवार , फिरोज लांजेवार, राजेंद्र शेरकुरे, टिकाराम मंगर, परिचर संवर्गा मधून नरेश जेंगठे, वैद्यकीय संवर्गातुन डॉ. विनोद म्हेशाखेत्री, आरोग्य संवर्गातुन जालिंद्र रायपुरे, विनोद सोनकूसरे,पशुसंवर्धन संवर्गातून वामन शेंडे, स्वप्नील पुलके, इतर मागास प्रवर्गातुन अखिल श्रीरामवार, अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातुन आरोग्य संवर्गाच्या निलू वानखेडे, महिला राखीव संवर्गातुन लेखा संवर्गाच्या सुरेखा घुमारे, आरोग्य सवर्गाच्या लीना भोयर मडावी, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्गामधून गणेश सुंकरवार आदि असे 15 उमेदवार आहेत.

विरोधी सहकार्य पॅनलचे सर्वसाधारण प्रवर्गातुन विवेक मुन, सुनील लोखंडे, माया बाळराजे, गणपत काटवे, परेश कोल्हे, राजेंद्र पटेल, इतर मागास प्रवर्गातुन राजेंद्र रेचनकर, विमुक्त जाती, विमाप्रतुन मंगला चंदनखेडे, अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातुन शोभा गेडाम, महिला राखीव प्रवर्गातुन विद्या आकनूरवार, छाया मानकर असे 11 उमेदवार रिंगणात आहेत. सहकार्य पॅनल मधील तब्बल चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. सहकार्य पॅनलचे छत्री तसेच परिवर्तन पॅनलचे विमान हे बोधचिन्ह आहे. सर्व संवर्गाचे कर्मचारी सहभागी व पूर्ण 15 उमेदवारासह परिवर्तन पॅनल असल्याचे दिसून येते. सर्वत्र चर्चा परिवर्तन पॅनलची असल्याचे कर्मचारी यांनी मत व्यक्त केले. मतदानाला येतांना ओळखपत्र सोबत आणावे असे दोनही पॅनलच्या उमेदवारांनी आवाहन केलेले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos