एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / गडचिरोली 
नक्षल सप्ताहाच्या सुरूवातीलाच नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात रस्त्याच्या कामावरील दहा जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर पेटवून दिली. या घटनेचे घाव ताजेच असतांना नक्षल्यांनी जाळपोळचे सत्र सुरूच ठेवत काल  रात्री आश्रम शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रक ला आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केली . यामुळे परिसरात भीतीमय वातावरण पसरले आहे . 
नक्षल सप्ताहाच्या सुरूवातीलाच नक्षल्यांनी  रंग दाखवायला सुरवात केली असून नक्षल्यांच्या पीएलजीएच्या बंद सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी एटापली तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरी येथे रात्री एका ट्रक ला नक्षल्यांनी लावली आग लावली . सप्ताह सुरु होण्याच्या आधीच १६ गाड्या जाळल्या नंतर हि दूसरी घटना घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-03


Related Photos