महत्वाच्या बातम्या

 अखेर कोरचीच्या बाजार चौकातील अतिक्रमणावर चढला बुलडोजर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची येथील बाजार चौकात 20-25 लोक अनेक वर्षापासून लहान - सहान दुकाने थाटून अतिक्रमण केले होते. या ठिकाणचे अतिक्रमण काढून त्याच जागेत बाजार संकुल बांधकाम करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी झाला होता. बाजार संकुलाचा आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर शासनाकडून मंजुरी सुध्दा मिळाली. 

या ठिकाणीचे अतिक्रमण हटविण्यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यात सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु काही लोक न्यायालयात गेले होते. तेथे त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने 2 मार्चच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस बजावली. परंतु लोकांनी अतिक्रमण हटविले नाही. आणि शेवटी तो दिवस आज उजाडला. आज सकाळी 9 च्या दरम्यान  मुख्याधिकारी तथा तहसीलदार माळी, अध्यक्ष हर्षलता भैसारे, उपाध्यक्ष हीरा राऊत, नगरसेवक डॉ. शैलेंद्र बिसेन, उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के, पोलीस अधिकाऱ्यांसह बुलडोजर घेऊन मोक्यावर आले. पोलीस प्रशासनाने लोकांना बजावून सांगितल्यावर लोकांनी आपापल्या दुकानातील सामान घाईगडबडीत काढले. तोच बुलडोजर त्यांच्या दुकानांवर झडपले. 

यात कोणत्याही दुकानदारांचा फारसा नुकसान झाला नसला तरी ह्या हातावर आणुन त्या हातावर खाणाऱ्या गरीब लोकांना उदरनिर्वाह करने कठीण होईल.

पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आज ही मोहीम राबविली गेली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos