दुसऱ्याच्या नावाचा गैरवापर करून फेसबुक वरून अश्लील छायाचित्र प्रसारित करणाऱ्या आरोपीस अटक


- वर्धा पोलिसांची कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
  तक्रारदाराच्या नावाने फेसबुक अकॉउंट तयार करून बदनामीच्या उद्देशाने फेसबुक च्या माद्यमातून अश्लील छयाचित्र प्रसारित करणाऱ्या आरोपीचा वर्धा पोलीस सायबर सेल च्या पथकाने शोध लावून त्याला अटक केली आहे. कैलासराव उकिनकर (२७) रा. रामनगर , नागपूर असे आरोपीचे नाव आहे . 
वर्धा पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल होताच सदर तपास तांत्रिक स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास सायबर सेल तर्फे करण्यात आला असून अज्ञात आरोपीने फेसबुक अकॉउंट चालवितांना वापरलेल्या सर्व तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून सातत्याने पाठपुरावा करून फेसबुक व आयडिया कंपनी यांच्यातर्फे माहिती प्राप्त करण्यात आली . त्यावरून सदर फेसबुक अकॉउंट हे नागपूर येथील श्रीकांत उकिनकर नावाच्या व्यक्ती वापरत असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले . प्रकरणाचा पुढील तपास करण्याकरिता पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी एक विशेष पथक तयार करून जिल्हा नागपूर येथे पाठविले . या पथकाने आरोपीचा शोध तो काम करीत असलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तसेच त्याचे राहते ठिकाणी घेतला असता तो त्याचे काम करीत असलेल्या कार्यालयात मिळून आला . आरोपीला विचारपूस दरम्यान कोणतीही कबुली केली नाही . परंतु सायबर टीमने त्याचे मोबाईल ,गूगल अकॉउंट यांची पाहणी करून विवादास्पद फोटो त्याच्या मोबाईल मध्ये असल्याचे निष्पन्न झाले . यांत्रिक पुराव्याच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आला . त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करून त्याला अटक  करण्यात आली . 
सदर कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे , पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या निर्देशाप्रमाणे सपोनि निर्मला किन्नाके ,पोहवा सलाम कुरेशी , स्वप्नील भारद्वाज , कुलदीप टांकसाळे , अक्षय राऊत , दिनेश बोथकर , लोमेश गाडवे , निलेश कट्टोजवार , अनुप कावळे ,जगदीश डफ , अभिजित वाघमारे , प्रदीप वाघ यांनी केली .   Print


News - Wardha | Posted : 2018-12-02


Related Photos