महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै ची विद्यार्थिनी गुजरातला रवाना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी : समग्र शिक्षा विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीतर्फे Exposure visit outside state उपक्रमा अंतर्गत प्रत्येक तालुक्यातुन 2  विद्यार्थी वर्ग 6 ते 8 च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल 1 ते 6 मार्च 2023 पर्यंत आयोजित केली आहे. यासाठी चामोर्शी पंचायत समिती मधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुणाघडा रै येथील विद्यार्थिनी स्वरा अरुण दुधे, आणि शिक्षिका प्रीती प्रल्हाद नवघडे ह्यांची निवड करण्यात आली. यासाठी 28 फरवरी 2023 ला सहल
गुजरातला रवाना झाली.

सदर गुजरात अभ्यास दौऱ्याला नाकाडे शिक्षणाधिकारी, चौधरी उपशिक्षणाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवली. स्वराच्या निवडी बद्दल गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, केंद्रप्रमुख गोमासे मुख्याध्यापक सुकलाल मेसोजी, विषय शिक्षिका वर्षा गौरकर प्रदीप वाळके, निमाई मंडल, गौतम गेडाम, रोशन बागडे, रेखा हटनागर आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos