महत्वाच्या बातम्या

 उन्हाळी धान शेतीमध्ये हिरवळीचे खत म्हणून ॲझोलाचा वापर फायदेशीर : डॉ. सुभाष पोटदुखे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांच्या मार्फत अझोला तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ०२ मार्च २०२३ ला कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले.

अझोला तंत्रज्ञान एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुभाष पोटदुखे, मुख्य अन्वेषक तथा सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर, डॉ. दमयंती गुळदेकर, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथील ज्ञानेश्वर व्ही. ताथोड, विषय विशेषज्ञ (कृषि अभि.), डॉ. पी.एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), एन.पी. बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र), पी.आर. नामुर्ते, प्रकल्प सहाय्यक अझोला तंत्रज्ञान, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली तसेच शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते.

डॉ. सुभाष पोटदुखे, मुख्य अन्वेषक तथा प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर यांनी अझोला ही एक पाण्यावर तरंगणारी नेचे वर्गातील पाणवनस्पती आहे. ही वनस्पती अतिशय थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे व झपाटयाने वाढणारी वनस्पती दुभत्या जनावरांना दुग्ध उत्पादनाकरीता अझोला फायदेशीर आहे. तसेच सेंद्रीय शेती करण्याच्या दृष्टीने हिरवळीचे खत म्हणून अझोल्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शास्त्रोक्त पध्दतीने अझोला उत्पादन वाढविण्याच्या पध्दती, धान शेतीमध्ये अझोल्याचा वापर करण्याची पध्दती, दुग्ध उत्पादनाकरीता अझोलाचे कार्य विषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अझोल्याची अतिशय झपाट्याने वाक होत असल्याने अझोला नत्र पुरविणारी वनस्पती आणि हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. अमोल्यामध्ये नत्र आणि पाप्यांचे प्रमाण जास्त असल्याने तो जमिनीत टाकल्याने लवकर कुजतो व त्या पासुन उत्तम प्रतिथे सेंद्रीय खत तयार होते असेही त्यांनी म्हटले.

डॉ. दमयंती गुळदेकर, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर ह्यांनी ॲझोला संवर्धन करतांना घ्यावयाची काळजी व जोपासणा विषयी विशेष मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ॲझोला संवर्धन करण्याकरीता ४० चौरस मीटर आकाराचा वाफा, गायीचे शेण, सुपर फॉस्फेट, फ्युरादान किटकनाशक, ताजे अझोला मातृ कल्चरची आवश्यकता असते असे त्यांनी प्रतिपादन केले.

ॲझोला वाढविण्याकरीता धान लागवडीकरीता वापरण्यात येणारी ओलीताची जमीन निवडावी व जमीन तयार करून सपाट करावी, २०२ मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत पाणी देण्याकरीता पाट तयार करावे, वाफ्यात १० से.मी. पर्यंत पाण्याची पातळी राखून ठेवावी आणि ॲझोला टाकावा आणि २ ते ३ आठवड्यानंतर वाफ्यामध्ये हिरव्या चटईसारखी अझोल्याची वाढ झालेली दिसेल.

डॉ. पी.एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी नैसर्गीक शेती करण्याचे तंत्रज्ञान आणि फायदे उपस्थित शेतकऱ्यांना समाजावून सांगितले. तसेच नैसर्गीक शेतीव्दारे रासायनिक खतांवर होणारा अवाजवी खर्च कमी होऊन अधिक उत्पादन मिळू शकते असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे जिवामृत तयार करण्याच्या पध्दतीवर मार्गदर्शन केले.

सदर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.आर. नामुर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos