महत्वाच्या बातम्या

 ठाणेगाव : शेतशिवारातील विहिरीत आढळले अज्ञात इसमाचे प्रेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याची घटना तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात २ मार्चला दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, ठाणेगाव येथील शामराव भुरसे यांनी शेतातील विहीरीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना दिले. माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी जावुन शाहनिशा केली असता, विहीरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केले. व आरमोरी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आले आहे. प्रेताचे शवविच्छेदन आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले, असुन अनोळखी मृतदेहावर अंतीमविधी करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिस स्टेशनशी संपर्क साधा

मृतकाच्या अंगावर पिवळ्या रंगाचे त्यावर निळया उभ्या रेषा असणारा फुल शर्ट, कथ्या रंगाचा फुल पॅन्ट व त्याच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये तांबूस रंगाच्या धातुची अंगठी घातलेली आहे. सदर मृतक इसमाचे अंदाजे (४०) वर्षे असून उंची ५.७ फूट आहे. सदर इसमाबाद्दल काहीही माहिती मिळाली तर ९०७९२०११००, ०७१३७२९५५३८, ८८३०९५३६२२ या मोबाईल क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा. असे आवाहन आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos