महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थिनींनी सरंक्षणासाठी स्वतः जागृत असावे : दीपक सिक्का


- विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी नमाद महाविद्यालयात कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग आणि करियर फाउंडेशन विकास गोंदियाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या.

प्रमुख अतिथी म्हणून मानवी हक्क संघटनेचे सचिव आदेश शर्मा, मानवाधिकार संघटना गोंदियाच्या शर्मिष्ठा सेंगर, दीपक सिक्का, डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ. अर्चना जैन उपस्थित होते. कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. प्रथम सत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी मागर्दर्शन करताना दीपक सिक्का म्हणाले, मुलींना, महिलांना आपल्या समाजात अबला समजले जाते. मुली आणि महिलांना सरंक्षणासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावेत ही आपल्या समाजाची धारणा आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या काळात ही धारणा बदलून मुलींनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचे सरंक्षण स्वतः केले पाहिजे, असे दीपक सिक्का यांनी सांगितले. यावेळी शर्मिष्ठा सेंगर यांनी भारतीय संविधानानुसार समाजातील महिलांचे अधिकार यावर मार्गदर्शन केले.  

अध्यक्षस्थाना वरून बोलताना प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी घडून गेलेल्या घटनेवर काही उपाय राहत नाही असे सांगत मुलींना सदैव सजग राहण्याचा सल्ला दिला. दीपक सिक्का यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे वेगवेगळे तांत्रिक कौशल्य दाखवले. ही तंत्रे वापरून मुलींनी स्वतःचे सरंक्षण करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीणकुमार यांनी तर आभार डॉ. अंबादास बाकरे यांनी मानले. यावेळी डॉ.बबन मेश्राम, डॉ. मस्तान शाह, डॉ. उमेश उदापुरे, डॉ. सुनील जाधव, डॉ. खुशबू होतचंदानी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी खुशबू मांडवे, आश्लेश गजभिये, अंशू मेश्राम, इशिता बेलगे पियुष मुरकुटे यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gondia




Related Photos