आजचे दिनविशेष
महत्वाच्या घटना (३ मार्च)
३ मार्च ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
३ मार्च १८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
३ मार्च १८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
३ मार्च १८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
३ मार्च १९२३ : टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
३ मार्च १९३० : नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
३ मार्च १९३८ : सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
३ मार्च १९३९ : महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
३ मार्च १९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
३ मार्च १९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
३ मार्च १९७३ : भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
३ मार्च १९८६ : ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
३ मार्च १९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
३ मार्च २००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
३ मार्च २००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
३ मार्च २०१५ : २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
जन्म (३ मार्च)
३ मार्च १८३९ : टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
३ मार्च १८४५ : जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
३ मार्च १८४७ : टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
३ मार्च १९२० : किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
३ मार्च १९२३ : इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
३ मार्च १९३६ : संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)
३ मार्च १९२८ : कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
३ मार्च १९३९ : भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)
३ मार्च १९५५ : विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)
३ मार्च १९६७ : गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.
३ मार्च १९७० : पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.
३ मार्च १९७७ : भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.
मृत्यू (३ मार्च)
३ मार्च १७०३ : इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)
३ मार्च १७०७ : सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
३ मार्च १९१९ : कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)
३ मार्च १९२४ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
३ मार्च १९६५ : पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
३ मार्च १९६७ : माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
३ मार्च १९८२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
३ मार्च १९९५ : तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.
३ मार्च २०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.
News - todayspecialdays